Featured post

FINISH STRONG - Effective Interview Tips - Power Dressing - Session 1

FINISH STRONG - Interview Tip - POWER DRESSING - Session 1 Youngsutra  has been instrumental in grooming the Youth by doing various a...

Saturday, 21 May 2016

#IamYoungsutra Trailer | Journey of Mountaineer Hero | Thrill | Suspense...





आसमंतात स्वछन्दि गरुडझेप घेणारा पहिला ‪#‎IamYoungsutra‬ सादर करतो आहोत...

सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर स्वछन्दिपने खेळन्याचे एक स्वप्न ऊराशी बाळगत व त्याच्याच शोधात असलेला एक तरुन, मराठ्यांचा इतिहास ज्या गडकिल्यांवर घडला त्या तटबंदयावर उभराहुन अवघ्या महाराष्ट्राला भुरळ घालन्याची आस मनाशी बाळगून त्या निसर्गाला बघण्याचा व त्याच्याशी संवाद साधन्याचा छंद जोपासनारा.
याच गोस्टीला स्वतःची ओळख म्हणुन स्वीकारण्यात मोठी गंमत समजून प्रत्येक संकटांना सामोरे जात परस्थितिवर मात करत या गडकिल्यांना आपलस करत, आपल्या स्वप्नांना साकार करत, क्यामेरयाच्या कुंचल्याने रंग भरत असलेल्या वाटसरु ची ही एक रोमहर्षक कहानी.
बेधुंद होऊन मनमुराद पने जगणारया या गरुडाला कसलीही भीती नव्हे कारण... स्वतः निवडलेल्या या क्षेत्रात अस काही करण्याची उमेद की जे आजपर्यंत कुनिच केले नाही आणि ते करण्याची हिंमत ही कुणी करणार नाही. मराठ्यांच्या पाऊल खुणांचा पाठलाग करत सर्वोच्च शिखर गाठणारा हा डोंगरवेडा.
या अवघ्या महाराष्ट्राला विळखा घालत असलेला तो एक बाबाभटकंतीच...
अरे... आहे बेधुंद याची धुंद साधी नाही आकाशाला गवसनी घालणारा गरुडच यशाची फळ पाही.
सह्याद्रीच्या दरी खोरयातुन गुंजनारा हर हर महादेवाच्या निनादासारखा !
जगदिश्वराच्या शिवलिंगावर उमटनारया सिंहनादासारखा !
राजसदरेवर घुमनारया शिवछत्रपतींच्या जय जय कारा सारखा !
अथांग सागरावर राज्य करणारया निळयाभोर आकाशासारखा !
तर... अजरामर सह्याद्रीच्याअंगाखांद्यावर बागडनारया वरयासारखा !
जगात हा मावळा कुठेच नसेल तेव्हा फक्त आणि फक्त तो इथेच असेल #IamYoungsutra

No comments:

Post a Comment